Maharashtra Politics : राज-उद्धव टाळी देणार? अस्तित्वाच्या लढाईत ठाकरे बंधू एकत्र?

Maharashtra Politics : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरलाय... त्याला कारण ठरलंय.. महेंद्र कल्याणकर या अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नातील ठाकरे बंधूंच्या भेटीचं आणि हास्यविनोदाचं.... लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्ष टोकाला गेला होता.. मात्र गेल्या तीन महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेमधील जवळीक वाढत चालल्याचं दिसतंय. नेमकी कशी? पाहूयात...

ठाकरे बंधू तिसऱ्यांदा एकत्र

15 डिसेंबर 2024

रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज- उद्धव ठाकरेंची भेट

22 डिसेंबर 2024

राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे-देशपाडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र

23 फेब्रुवारी 2025

Amol Mitkari : नीलम गोऱ्हे यांच्यावर केलेले आरोप खोटे; आमदार अमोल मिटकरींकडून संजय राऊतांच्या आरोपाचे खंडन

शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट

विधानसभेत मनसे आणि ठाकरे गटाची धुळधाण झाली.. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या आहेत.. मात्र या भेटीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाने मात्र स्वागत केलंय. तर मनसेने ही राजकीय भेट नसल्याची प्रतिक्रीया दिलीय.

मात्र यापूर्वीच आदित्य ठाकरेंनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत साम टीव्हीशी बोलताना सूचक संकेत दिले होते. लोकशाही हिताचं बोलत नाही तोपर्यंत समझोता नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

खरंतर लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचीही मोठी घसरण झालीय.. त्यामुळे ब्रँड ठाकरे टिकवण्यासाठी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार का? याकडे लक्ष लागलंय...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply