Maharashtra Politics : नाशिकच्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने हे एबी फॉर्म पाठवणे शिंदे सेनेच्या अंगलट आले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आपल्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून विचारणा होताच जिल्हा प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरने एबी फॉर्म नेमकं कुणी आणलं? त्यात कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी एबी फॉर्म मागवण्यात आले? त्याला किती खर्च आला? यासह अन्य बाबींची चौकशी होणार आहे.
|
यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाईच स्वरुप निश्चित होणार आहे. २९ तारखेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या अवघ्या काही वेळ अगोदर शिंदे सेनेकडून एबी फॉर्म देण्यात आले होते. दिंदोरीच्या धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिरराव यांना हे एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये याचीच चर्चा होत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यंदाच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य झाले आणि अनेक पक्षांतील नेत्यांकडून बंडखोरी करण्यात आली. महायुतीमध्ये देखील अनेक ठिकाणी बंडखोरी झाली.
महायुतीतील दुसऱ्या पक्षाला जागा देण्यात आली असताना त्याठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. वेळेमध्ये उमेदवारी अर्ज भरावा यासाठी शेवटपर्यंत सर्व इच्छुकांची धावपळ झाली. अशामध्ये शिंदे गटाने आपल्या पक्षाच्या नाशिकमधील दोन उमेदवारांसाठी शेवटच्या क्षणाला हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले. नाशिक देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
शहर
- Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत मातीचा ढिगारा घसरला, ५ जण मलब्याखाली अडकले, एकाचा मृत्यू
- Pune Bridge Incident : पुण्यात जोरदार पाऊस, कुंडमळानंतर आणखी एक पूल वाहून गेला; परिसरात मोठी खळबळ
- Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्ते जलमय, शेवटी जेसीबीनेच काढावे लागले साचलेले पाणी; नागरिकांचा संताप
- Navi Mumbai Crime : १२ हजार पगार, वाजवी पगारात खर्च भागेना; नवी मुंबईतल्या तरुणीच्या आत्महत्येचं कारण समोर
महाराष्ट्र
- MHADA : पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ५२ फ्लॅट अन् २८ ऑफिससाठी नोंदणी सुरु, अर्ज मागवले
- Shocking Crime : '२ हजार द्या डेडबॉडी गुंडाळतो'; मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा लाचखोर सीसीटीव्हीत कैद
- Sambhajinagar : मुलीची भेट ठरली शेवटची; माघारी परतताना काळाची झडप, नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकऱ्यासह बैल बुडाला
- Politics : मोठी बातमी! पुण्यात काँग्रेसला मोठा झटका, फायरब्रँड महिला नेत्याची शिंदे गटात एन्ट्री
गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद- लंडन एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली
- Air India : दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, पायलटने हवेतच...
- Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, गुप्तकाशीसाठी निघालेल्या सहा भाविकांसह पायलटचा मृत्यू
- Air India Plane Crash : चहाच्या टपरीवर झोपला होता, विमान कोसळताच भडका; मुलाला जळताना पाहून आईनं घेतली धाव; पण शेवटी..