Maharashtra Politics: महायुतीत वादाच्या ठिणग्या! अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवताच राष्ट्रवादीचे नेते भडकले; अमोल मिटकरींचं थेट फडणवीसांना आव्हान

 Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला जुन्नरमधील नारायणगावमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान ही घटना घडली. यावरून आता राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आक्रमक झाले असून या घटनेचा निषेध करत त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा.', असे म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपसोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ulhasnagar Crime : रिक्षा चालकाच्या घरावर गोळीबार; उल्हासनगरातील पहाटेच्या सुमाराची घटना

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी. अनेक जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री आहेत. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विविध जिल्ह्यात जाऊन शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात. त्यावेळी महायुतीतील इतर घटक पक्ष त्यावर आक्षेप घेत नाहीत. मग पालकमंत्री म्हणून अजित पवार आम्हाला डावलतात. असा आक्षेप कशासाठी? भाजपच्या नेत्या आशा बुचकेंच्या या टीकेला उत्तर देण्याची मला तरी काही गरज वाटत नाही.' तसंच, मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री नावाचा उल्लेख केला जात नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. महायुतीत कोणताही दुरावा निर्माण झालेला नाही.' असे देखील तटकरे यांनी सांगितले.

अजित पवारांना काळे झेंडे दाखवणे ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचे म्हणत रुपाली चाकणकरांनी आशा बुचकेंची खिल्ली उडवली खिल्ली. त्यांनी सांगितले की, 'भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचकेंनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले ही निव्वळ एक स्टंटबाजी होती. काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागायला मदत झाली असती. पण केवळ बातम्या व्हाव्यात म्हणून बुचकेंनी ही स्टंटबाजी केली, असा पलटवार रुपाली चाकणकरांनी केला. बुचकेंच्या या भूमिकेने महायुतीत कोणताही खडा पडणार नाही, असा दावा ही रुपाली चाकणकरांनी केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply