Maharashtra Politics : 'चारशे नव्हे, ५०० पार गेले तरी 'हिंदूराष्ट्र' घोषित करू शकत नाही', अमोल मिटकरींनी भाजप आमदाराला सुनावले!

Maharashtra Politics : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन व हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनीलोकसभा निवडणुकीत 400 पार झालो असतो तर हिंदूराष्ट्र बनले असते' असे मोठे विधान केले होते. टी. राजा यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

"भिवंडीमधील एका कार्यक्रमात टी. राजा या व्यक्तीने ४०० पार गेलो असतो तर हे हिंदुराष्ट्र झाले असते, असा अजब दावा केलाय. कदाचित टी. राजाला हे माहित नसावं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले, अन् त्याच चौकटीत राहून या देशाला 'भारत'राष्ट्र हे नाव दिले. 400 नव्हे तर पाचशे'पार जरी गेले तरी कोणीही भारत देशाला हिंदूराष्ट्र घोषित करू शकत नाही," असे अमोल मिटकरी म्हणाले.

Manoj Jarange : "कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष" मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

तसेच "टी. राजा यांचा अभ्यास थोडा कमी आहे. त्यांनी अभ्यास करावा आणि सत्ता कोणाचीही सत्ता असो, हा देश फक्त आणि फक्त भारत'राष्ट्र म्हणून राहिलं. त्याचा हिंदू अथवा इस्लाम'राष्ट्र होणार नाहीये हे लक्षात ठेवावे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

काय म्हणाले होते टी. राजा?

नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 400 पार झाले असते तर भारत हिंदुराष्ट्र झाले असते, असे आमदार टी. राजा यावेळी म्हणाले. तसेच जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद ,गो हत्या ,धर्मांतर यावर कायदा का होत नाही? असा सवाल विचारीत हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

 
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply