Maharashtra Politics : शरद पवार गटाला धक्का! युवा शिलेदार धीरज शर्मांचा अजित पवार गटात प्रवेश, सोनिया दुहानही उपस्थित

 

Maharashtra Politics : राज्यातील लोकसभा निवडणुकांचा संग्राम संपला आहे. आता सर्वांना लोकसभेच्या निकालाची उत्सुकता आहे. मात्र या निकालाआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. तसेच या बैठकीला राष्ट्रीय युवती अध्यक्षा सोनिया दुहान यांनीही हजरी लावल्याने त्यांचा पक्षप्रवेशही निश्चित मानला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी युवा शिलेदारांना सोबत घेऊन पक्षबांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी युवती अध्यक्षा सोनिया दुहान तसेच धीरज शर्मा यांच्यावर त्यांनी मोठी जबाबदारीही दिली होती. मात्र लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधीच या दोन्ही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Pune News : रवींद्र धंगेकरांनी दोन दिवसांत माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; हसन मुश्रीफांचा इशारा

शरद पवार यांच्या या युवा शिलेदारांनी तुतारीची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीवेळी धीरज शर्मा यांचा पक्षप्रवेश झाला. पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ आदी नेते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभेनंतर आता विधानसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे. विधानसभेतही नवा पक्ष घेऊन मैदानात उतरण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्या समोर आहे. त्याआधीच राष्ट्रीय पातळीवर दोन युवा शिलेदारांनी साथ सोडल्याने शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply