Maharashtra Politics : मला मोदीजींनी सांगितलं लोकसभा नाही, तर बूथ जिंकायचा आहे; देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics : भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त  पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी बूथ लेवलवर चालणाऱ्या कामाचा आढावा घेत माहिती दिली. जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुथवर काम करताना कशा पद्धतीने काम करायचं आहे, याचा कानमंत्र ही दिला आहे. तसेच पश्चिम नागपूरच्या मतदारांवर काँग्रेसचे लोकसभेच्या उमेदवाराचं पराभव करण्यासाठी जबाबदारी अधिक आहे. कारण काँग्रेसचे विकास ठाकरे हे याच विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक मनावर घेण्यासाठी प्रोत्साहन देखील दिलं आहे. 

देवेंद्र फडणवीस  बोलताना म्हणाले की, मी दहा वर्ष पश्चिमचा आमदार राहिलो आहे. त्यामुळे माझं नातं वेगळं आहे. पश्चिम नागपूरची जागा गमवावी लागली. मला विश्वास आहे, आपण मनावर घेतले तर नितीन गडकरी यांना मोठी लीड मिळेल. येत्या विधानसभेत पश्चिम नागपूरात कमळ फुलून आमदार निवडून येईल, यातही मला शंका नाही.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंना बारामतीत धक्का! प्रवीण माने सुनेत्रा पवारांना देणार पाठिंबा? आज स्पष्ट करणार भूमिका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने आणि भारताने जी प्रगती केली आहे, ती लक्षणीय अशी आहे. आज जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. हे सांगताना मला आनंद होत  आहे. भारतातही सर्वाधिक खासदार भाजपचे, सर्वाधिक आमदार भाजपचे, सर्वाधिक जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर विधानसभा विधान परिषद सदस्य भाजपचे आहे. मागील दहा वर्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवर्तन केलं आहे.

मागील निवडणुकीमध्ये नितीनजींना या मतदारसंघातून 27,200 मतांची लीड होती. यावेळी जर तुम्ही मनावर घेतलं, तर ही लीड वाढून 50,000 हजाराचा पर्यंत नेता  येईल. कारण काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे पश्चिम नागपूरचे आमदार आहे. त्यांना पश्चिम नागपूरमध्ये जर आपण पन्नास हजार मतांनी पराभूत केलं, तर पाच लाखांनी नितीनजींना निवडून आणायचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करू शकू.

वर्षानुवर्ष संघटनेमध्ये एक गोष्ट आपण नेहमी ऐकतो. दिवंगत नेते प्रमोद महाजनजी सांगायचे. कितीही चांगली हवा असलेली सायकल घेऊ आलो तर ट्यूबमध्ये ती हवा जात नाही. त्यात पंप मारून हवा भरावी लागते. हवा चांगली आहे, पण तुम्ही पंप नाही मारला, आणि घरी बसले तर असं चालणार नाही. मतदारांची एकच अपेक्षा आहे, कोणीतरी मला येऊन भेटलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी पंप मारून हवा भरली नाही, तर मशीनमध्ये वोट पडणार नाही. त्यामुळे पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांमध्ये माझा खूप विश्वास आहे. ते नक्की मनावर घेऊन काम करणार आहे.

प्रत्येक बुथवर मतदान वाढलं पाहिजे, हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मेळावे खूप होतात, बैठका खूप होतात. पणमतदारांना कोणीच भाषण देत नाही. पण असं करायचं नाहीये. मोदीजींनी सांगितलं मला लोकसभा  नाही तर मला बूथ जिंकायचा आहे. ही लढाई बूथची आहे. आज मी स्वतः बुथची बैठक घेतली. दोन बुथवर तीन तास गेलो. कोण कोण आपले आहे कोण नाही, जे आपले नाही त्यांना आपलं कसं करायचं या सगळ्या संदर्भात प्लॅनिंग मी स्वतः करून घेतलं. प्राथमिक स्वरूपात काही घरांमध्ये मी स्वतः जाऊन आलो. मी जर हे करू शकतो, तर आपण सगळे हे करू शकतात. जर मी माझे पाच तास काढून सुपर वॉरियरचं काम करू शकतो, तर पश्चिम नागपूरचे बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुख यांनी हे काम केलं पाहिजे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply