Maharashtra Politics : पक्ष सोडणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही; काँग्रेस प्रभारींचा अशोक चव्हाणांवर संताप

Maharashtra Politics : दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. आज काँग्रेस प्रभारी रमेश चैन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले रमेश चेन्नीथला?

"जे लोक पक्ष सोडून जात आहे त्यांच्यामागे लोक नाहीत, त्यांच्याबरोबर कोणीही जाणार नाही. काँग्रेसनं त्यांना काय नाही दिलं, दोनदा मुख्यमंत्री बनवलं. प्रदेशाध्यक्ष पद दिलं. तरीही त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण सांगायला पाहिजे होते. त्यांच्यावर ईडी, सीबीआयचा दबाव होता का? स्पष्ट करावं," असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

Delhi Politics : दिल्ली लोकसभेसाठी 'आप'चा काँग्रेसला अल्टिमेटम; वेळीच निर्णय द्या नाहीतर..

"अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप आहे. पंतप्रधान मोदींनी हे आरोप केले होते. आता अशोक चव्हाण त्यांच्यासाठी चांगले झाले. अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. ते त्यांच्याकडे आले त्यांची चौकशी बंद झाली. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये जा.." अशा शब्दात चेन्नीथला यांनी भाजपचा समाचार घेतला.

पण "अशाप्रकारे जो कोणी जात असेल त्याला जनाधार नाही. महाविकास आघाडी अभेद्य आहे. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. मी शरद पवार, उद्धव ठाकरेंना भेटलो.लवकरच जागावाटप होईल, आम्ही लढा देऊ," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply