Maharashtra Politics : भाजप आमदाराच्या गोळीबारानंतर ठाकरे गटाचे CM शिंदेवर गंभीर आरोप; ईडी-सीबीआय चौकशीची मागणी

Maharashtra Politics : भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शहराध्यक्षांवर गोळीबार केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले.

"आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या राज्यात काय चाललं आहे, याचा उद्रेक आणि याचा स्फोट गायकवाड यांच्या कृत्यानंतर झाला आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

Vidarbha Politics : विदर्भात 10 लोकसभा जागांसाठी भाजपाची जोरदार तयारी; महायुतीत कोणाला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष

"मला गुन्हेगार बनवण्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी हातात हत्यार घेण्यास मजबूर केलं, असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. हे अत्यंत गंभीर असून त्यांच्या आरोपांची ईडी, सीबीआय चौकशी करण्यात यावी", अशी मागणी देखील खासदार संजय राऊत  यांनी केली आहे.

"माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे. शिंदे यांनी आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं, हे कोट्यावधी रुपये गायकवाड यांनी शिंदे यांच्याकडे का ठेवले? गायकवाड यांना ते पैसे कोणत्या मार्गाने प्राप्त झाले, याची देखील चौकशी व्हावी", असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या या आरोपांना शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "उबाठा गटाकडून कुणी काही आरोप तसेच मागणी केली, त्याला मी किंमत देत नाही. महत्वाचा प्रश्न हा आहे, की गणपत गायकवाड पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई केली असून कोर्टाने त्यांना कोठडी देखील सुनावली आहे", असं सामंत म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply