Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगर येथील राड्याचे मास्टरमाइंड फडणवीसच; ठाकरे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : देशभरात आज (३० मार्च) श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्रीपोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी केल्याचा प्रकार घडाला. दरम्यान या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-भाजप सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संभाजीनगर येथे २ एप्रील रोजी महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमिवर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे, मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा एकही जातीय दंगल झाली नाही, पण आता इतक्या झाल्या की विचारू नका. गृहमंत्री कुठं असतात माहिती नाही. गृहमंत्री आणि सरकारचं हे अपयश आहे.

खैरे पुढे बोलताना म्हणाले की, काल हा प्रकार झाला, आज रामनवमी आहे. यामुळे संपूर्ण देशात दंगलीचं वातावरण होईल. महत्वाचं म्हणजे हा २ तारखेला जो महाविकास आघाडीचा मेळावा डिस्टर्ब करण्याचा हा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. रामनवमी होऊ नये, मेळावा होऊ नये म्हणून कालचा प्रकार झाल्याचे खैरे यावेळी म्हाणले.

खैरे म्हणाले की, भाजप आणि देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री भागवत कराड आणि इम्तियाज जलील हे सगळे दोस्त आहेत. महानगर पालिका, विधानसभा- लोकसभा, जिल्हापरिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणूकासाठी हा गेम केला जात आहे. हे भागवत कराड आणि इम्तियाज जलील या दोघांचं प्लॅनिंग आहे, देवेंद्र फडणवीस यात मुख्य आहेत आणि त्यांनी हे राजकारण करून महाराष्ट्राच्या जनतेस वेठीस धरलं आहे, असेही खैरे यावेळी म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

कालच्या घटनेचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काही फरक पडेल का याबद्दल विचारले असात खैरे म्हणाले की याचा अजिबात फरक पडणार नाही. इतके मराठवाड्याचे लोक येतील की ते पाहूनच लोक पळून जातील. आज संध्याकाळ पर्यंत यांना पकडलं पाहीजे असेही खैरे यावेळी म्हणाले.

हे पोलिसांपेक्षा सरकारचं अपयश आहे, कारण पोलिसांच्याच गाड्या जाळल्या त्यांनी यावर कारवाई केली पाहीजे असेही खैरे यांनी यावेळी सांगितले.

नेमकं झालं काय होतं?

संभाजीनगर शहरातील किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.

रस्त्यावर मंदिराशेजारी उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन सगळ्यांना आवाहन केले.

सध्या संभाजीनंगर येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

इम्तियाज जलील अतुल सावे प्रदीप जयस्वाल आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वत: मंदिरात कोणतीही हानी नाही अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply