Maharashtra Politics : राज ठाकरे-एकनाथ शिंदे युती करणार? मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics :  महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या नाट्यमयी घडामोडींनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज अनेक चर्चा पाहायला मिळतात. शिवसेनेतील  अंतर्गत बंडानंतर आता उद्धव ठाकरेआणि राज ठाकरे  एकत्र येणार असल्याच्या चर्चा वारंवार कानावर येत होत्या. पण सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता याबाबात मनसे  नेते संदीप देशपांडे  यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील, तसेच ते मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. अशातच आताचे मुख्यमंत्री भेटतात, आधीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते, असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "मुळात विषय असा आहे की, आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी, आधीचे जे मुख्यमंत्री होते, ते भेटायचेच नाही कोणाला. जे काही महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सन्मानिय राज ठाकरे घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल, तर त्यात वावगं नाही. 

Amol Mitkari News : दादांवर काय बोलता, त्यांनी तुम्हाला कामाला लावलं...; अमोल मिटकरींची कोल्हेंवर टीका

राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील : संदीप देशपांडे

"राज कारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. 2024 च्या पोटात काय दडलंय? हे कोणाला माहीत. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल, तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल.", असं संदीप देशपांडे म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेंकडेच : संदीप देशपांडे 

संदीप देशपांडे म्हणाले की, "राज ठाकरेंकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे, वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे, पण विचारांचा वारसा आहे, तो राज ठाकरेंकडेच आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांची महाराष्ट्राबाबतची स्वप्न, त्यांची हिंदुत्वाबाबतची कास कोणाकडे असेल तर ती राज ठाकरेंकडेच. त्यांचे विचारही सर्व जनतेला आपलेसे वाटतात. कोणतंही राजकारण करताना मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे, हे धोरण असलं पाहिजे." 

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *