Maharashtra Politics : भरत गोगावले मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी स्वत: मंत्रीपद नाकारलं; उदय सामंत यांचा खुलासा

Maharashtra Politics : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघाला, तर आमदार भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाची नेहमीच चर्चा होत असते. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मला स्थान नक्कीच मिळणार, असा विश्वास भरत गोगावले कार्यकर्त्यांसमोर व्यक्त करत असतात. अनेकदा विरोधीपक्षांच्या नेत्यांकडून त्यांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला जातो. मात्र, तरी देखील गोगावले शांतपणे उत्तर देतात.

अशातच भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाबाबत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यात जेव्हा शिंदे-भाजप सरकार स्थापन करायचे होते. त्यावेळी कुणाला मंत्रीपद द्यायचं याचा पेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता. तेव्हा भरत गोगावले यांनी सरकार बनवण्यासाठी स्वत: मंत्रीपद नाकारलं होतं, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

MP Bus Fire News : मध्य प्रदेशात बसला लागली भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार भरत गोगावले बुधवारी रायगड दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मंत्री उदय सामंत यांनी भाषण करताना गोगावले यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा खुलासा करत सर्वांनाच चकीत करून टाकलं.

काय म्हणाले उदय सामंत?

"राजकारणात आज कुणाला कोणतंही पद मिळवायचं असेल, तर कधी तो दुसऱ्यासाठी माघार घेत नाही. ज्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार होता, तो दिवस मला आठवतो. मी एकनाथ शिंदे साहेब आणि भरत गोगावले पहाटे ४ वाजता एकत्र चर्चा करत बसलो होतो".

"कुणाला मंत्रीमंडळात स्थान द्यायचं आणि कुणाला नाही, असा संभ्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता. पण त्यावेळी भरत गोगावले यांनी थेट सांगितलं, की तुम्हाला जर अडचण होत असेल, मानसिक त्रास होत असेल, तर मला मंत्रीमंडळात घेऊ नका. तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजेच मीच मुख्यमंत्री झालो", असा खुलासा सामंत यांनी केला.

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी भरत गोगावले यांना एक मोलाचा सल्ला देखील दिला. भरत गोगावले यांनी स्वतःचा स्वभाव बदलण गरजेचं आहे. ते लोकांवर इतका विश्वास ठेवतात, की त्यांच्यातील किती टक्के लोक त्यांना फसवतात, हे त्यांनाही माहित नसते, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply