Maharashtra Politics 2024 : त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा; महाविकास आघाडीवर CM एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

Maharashtra Politics 2024 : महाविकास आघाडीत पक्षांकडे ना झेंडा आहे ना अजेंडा. कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला स्वत: चा पक्ष वाचवता आलेला नाही. त्यांनी त्यांचे पक्ष सांभाळावेत, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर टीका केली. तसंच येत्या दोन दिवसात उर्वरीत जागावरील उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार असलेले राजू पारवे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसंच महायुतीतील नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारसभे सहभागी होणार आहेत. विदर्भातील सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Ahmednagar News : स्मशानभूमीला जाण्यास रस्ता नाही तर आता मतदान नाही; वाघवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

डॉक्टरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यावर मुख्यमंत्री म्हणून आणि सरकार प्रयत्नशिल राहिलं. आपली आरोग्य यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे. कितीही सरकारी रुग्णालये झाले तरी लोकसंख्येमुळे आपल्याला खाजगी रुग्णालयाची गरज आहे. तसंच ग्रीन हायड्रोजन ला प्रमोट करणारं आपलं पहिलं राज्य आहे. समृद्धीवरून आधी कोणी प्रवास करत नव्हतं आता चित्र बदललं आहे. कानेक्टिव्हिटी आवश्यक आहे, नागपुरात मेट्रोचे काम सुरू आहे.

विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज जगात देशाचं नाव आदराने घेतलं जातं. त्यामुळेच नरेंद्र मोदी जगात मोठी लोकप्रियता आहे. देशात गेल्या 10 वर्षात विकासाचं मोठं कार्य झालं आहे. मोदींना तिसऱ्यांदा पीएम बनवण्यासाठी महाराष्ट्रातून एक एक खासदार पाठवायचा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply