Maharashtra Politics : शिंदे गटाचा मास्टर प्लान, ठाकरे गटाच्या ४ खासदारांना नोटीस धाडणार; कारण काय?

Maharashtra Politics : एकीकडे शिवसेना कुणाची, १६ आमदार अपात्र की पात्र? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाने मास्टर प्लान आखला आहे.

ठाकरे गटाच्या ४ खासदारांना नोटीस पाठवण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. लवकरच या चारही खासदारांवर कारवाई केली जाणार, अशी माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 

Nashik Mobile Blast : मोबाईलच्या स्फोटाने नाशिक हादरलं! घरांच्या काचा फुटल्या, ३ जण जखमी

नुकतंच केंद्रातील मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. यासाठी संसदेत मतदानही घेण्यात आलं. या मतदानाच्या दिवशी ठाकरे गटाचे चार खासदार अनुपस्थित होते.

त्यांनी अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णयही लोकसभा सचिवालयाला कळविला नसल्याचं सांगितलं जातंय. याच मुद्द्याला हाताशी धरून शिंदे गटाने ठाकरे गटाच्या चार खासदारांना कोंडीत पकडण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या कृतीवर खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाईल, असं शिंदे गटाने पत्रद्वारे सूचित केले आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी १४ सप्टेंबरला व्हिप काढला होता. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शिवसेना खासदारांनी मतदान करावं, असं भावना गवळी यांनी व्हीपद्वारे म्हटलं होतं.

मात्र, विनायक राऊत, राजन विचारे, ओमप्रकाश निंबाळकर, संजय जाधव हे हजर नसल्याने त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले नाही. त्यामुळे शिंदे गटाने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे.

लवकरच या चारही खासदारांना एक नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या या रणनितीला आता ठाकरे काय उत्तर देणार, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply