Maharashtra Politics : सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी;अजित पवार गैरहजर! अमित शहा यांची फडणवीस-शिंदेंसोबत ४५ मिनिटे चर्चा

Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज मुंबई आले आहेत. मुंबईत त्यांचं आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

सोमवारपासून विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू होणार आहे. यातच अमित शाह हे देवेंद्र फडणीवस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले होते. येथे शाह, देवेंद्र फडणीवस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा बऱ्याच वेळ चर्चा झाली.

Varanasi Cricket Stadium : वाराणसी होणार शिवमय; PM मोदींनी केलं क्रिकेट स्टेडियमचं भूमीपुजन, कार्यक्रमाला दिग्गज मंडळीची हजेरी

यावेळी आमदार अपात्रतेबाबतच्या रणनीती आणि आगामी निवडणुकांबाबत महत्वाची चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सागर बंगल्यावर इतर भाजपा आणि शिंदे गटातील नेते उपस्थित होते. मात्र, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघेच बंद दाराआड चर्चा करत होते. 

मिळालेल्या माहितीनुसार,सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर हे ज्याप्रकारे आमदार अपात्रतेबाबतचा प्रश्न हाताळत अहेत, त्यावर ताशेरे ओढले होते. तसेच याप्रकरणी कारवाई कुठंपर्यंत पोहचली, याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले होते. यानंतर नार्वेकर यांनी पुढील आठवड्यात सुनावणी ठेवली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply