Maharashtra Politics : शरद पवारांचं शक्तीप्रदर्शन, पक्षासाठी बाप-बेटे मैदानात; जयंत पाटील मुंबईत तर प्रतीक पाटील कराडमध्ये

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले आहेत. अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला.

रविवारी झालेल्या अभूतपूर्व राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराडमध्ये शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी यशवंतराव चव्हाण  यांच्या स्मृती स्थळाला भेट देत शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संघर्षाच्या काळात पक्षासाठी बाप-बेटे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  कालपासून मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. जयंत पाटील मुंबई येथे थांबून सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवत आहेत आणि येणाऱ्या काळाची व्यूहरचना आखत आहेत. तर त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडमध्ये आले आहेत. शरद पवार यांच्यासह कराड येथे आमदार रोहित पवार,आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित आहेत.

Mumbai Heavy Rain : घाटकोपरमध्ये घर कोसळून ४ जखमी; ठाण्यात ३५ फुटांची भिंत चाळीवर कोसळली

शरद पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या प्रवृत्तीना त्यांची जागा दाखवून देवू. काही समाज विघातक प्रवृत्तीकडून महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका घेतली जात आहे. त्याला तुमचे माझे सहकारी बळी पडले आहेत. परंतु सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील, पण महाराष्ट्राची शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही', अशा शब्दात शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यांनी सरकारमध्ये सहभागी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. अजित पवारांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तर अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply