Maharashtra Political : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप? अजित पवार राजभवनावर दाखल, राष्ट्रवादीचे काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार?

Maharashtra Political : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस देखील राजभवानावर दाखल झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ आणि अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. अजित पवार लवकर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Jalgaon Police : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळलं, आषाढी एकादशीच्या दिवशीच पोलीस अधिकाऱ्यासह चालकाचा दुर्देवी अंत

राष्ट्रवादीतील 40 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. यापैकी 9 आमदार अजित पवारांसोबत शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवारांसह हे 9 आमदार राजभवनावर दाखल झाले आहेत. यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचादेखील समावेश आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply