Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणात चाळीस आमदार अपात्र झाले तर उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळेल; तज्ज्ञांचं मोठं भाष्य

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात चाळीस आमदार अपात्र झाल्यास शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना राहणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. यावर वकील असीम सरोदे यांनी मोठं भाष्य केलं आहे

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरेंना न्याय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर तज्ज्ञांनी उद्धव ठाकरे यांना फायदा होईल, असे म्हटले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावरील तज्ज्ञांच्या मतावर अॅड. असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे. 'सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा परिणाम हा निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्ष चिन्ह बाबतचा निर्णयावर होईल. आमदार अपात्र झाले तर उद्धव ठाकरेंना त्याचा थेट फायदा होईल. मात्र, त्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणावर कोर्टाची सुनावणी प्रक्रिया पार पाडावी लागेल, असं मत वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावरील तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय आहे?

सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय होईल. तसेच सुप्रीम कोर्टाचा निकाल समोर आल्यानंतर त्यात ४० आमदार अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाळीस आमदार अपात्र झाल्यास एकनाथ शिंदे यांची शिवसेना राहणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply