Maharashtra Police Bharti 2024 : पुण्यात पोलीस भरतीला विरोध कायम; सलग दुसऱ्या दिवशी दंडवत घालत आंदोलन

Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण १७ हजार ४७१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला आजपासून म्हणजेच १९ जूनपासून सुरूवात झालीये. दरम्यान, पुण्यात या भरतीला विरोध करण्यात येत आहे.

पोलीस भरतीला सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारविरोधात दंडवत घालत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पोलीस भरतीचे  वय वाढवून मिळावे या मागणीसाठी पुण्यात रात्रभर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे.

CNG Gas : 'सीएनजी'मुळे जीवनाचा 'प्रवास' समृद्ध '

खासदार निलेश लंकेंचा विरोध

पोलीस भरतीला खासदार निलेश लंके यांनी देखील विरोध केला आहे. सध्या राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक विद्यार्थ्यांची तयारीही झालेली नाही. तसेच पावसामुळे विद्यार्थ्यांना काही अडचणींचा त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी लंकेंनी केली होती. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहिलं होतं.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply