Maharashtra Weather Update : काळजी घ्या, राज्यात उष्णतेची लाट; नाशकात उष्माघाताचा पहिला बळी

पुण्यासह राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा हा ४० अंशाचा पार गेल्याचा पाहायला मिळत आहे. पुणे वेधशाळेने १४ मे पर्यंत तापमानात वाढ होणार असल्याचे वर्तवले आहे. याचदरम्यान, नाशिक जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे.

राज्यातील अनेक नागरिक उन्ह्याच्या कडाक्यामुळे त्रस्त झाले आहेत. राज्यातील अनेक भागात तापमान पारा चाळीशीच्या वर गेला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भातही उष्णतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा वाढल्याचे समोर आले आहे. पुणे वेध शाळेने १४ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. कडक उन्हामुळे नाशिक तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. नाशिक तालुक्यातील राहुरीमध्ये दुपारी शेतात काम करत असताना शेतकऱ्याला अचानक चक्कर आली.

यानंतर शेतकऱ्याला उपचारासाठी दाखल केलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलं. साहेबराव आव्हाड असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. तळपत्या उन्हात काम करत असताना उष्माघाताचा त्रास होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . नाशिकमध्ये दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे.
नागपूरात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे. शहरातील गोळीबार चौकात फुटपाथवर ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर होईल मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, उष्माघातामुळं मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
नागपूरचं तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंशावर जाण्याचा हवामान खात्याचा इशारा आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply