Maharashtra Lok Sabha Election : येत्या २४ तासात उत्तर द्या; शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस

Maharashtra Lok Sabha Election : विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढण्यावर अडून असल्यामुळे शिवसेनेकडून कारणे दाखवा नोटीस बजाबण्यात आली आहे. अजित पवार गट महायुतीत असताना विजय शिवतारे सातत्याने त्यांच्यावर आरोप करत आहेत, शिवाय पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा नसताना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे येत्या २४ तासात उत्तर द्यावं, अशी नोटीस शिवतारे यांना बजावण्यात आली आहे.

शिंदे गटाचे विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात लढवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली असून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. तरीही शिवतारे आपल्या भूमिकांवर ठाम असून अजित पवारांविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत.

Arvind Kejriwal: जेलमधून केजरीवालांनी दोन आदेश दिले? ईडीने दिले स्पष्टीकरण,'त्यांना सही करण्याची परवानगी...'

मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही समजावून देखील शिवतारे यांच्या भूमिकेत तसूभरही फरक पडलेला नाही. त्यामुळे शिवतरेंवर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीनंतर तरी शिवतारे युतीधर्म पाळतात का? की आपल्या भूमिकेवर ठाम राहतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र शिवतरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास पक्षातून त्यांची हकालपट्टी केली जाईल अशी माहिती शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने दिली आहे.

शिवतारेंवर येत्या दोन दिवसात निर्णय : भरत गोगावले

बारामती मतरासंघात विजय शिवतारे यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दोनवेळा बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र युतीत असताना शिवतारे यांनी वातवारण तापत ठेवण्यासाठी वेगळी विधानं करणं चुकीचं आहे. त्याचा परिणा इतर मतदारसंघावर होऊ सकतो. अशा भूमिकेमुळे शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांवर पक्षातील अजून कोणतरी निवडणूक लढण्यावर अडून बसेल. त्यामुळे येत्या दोन दिवसात शिवसेना यावर निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते भरत गोगावले यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply