Maharashtra Election : सांगलीत आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक; विशाल पाटील यांच्याबाबत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता

Maharashtra Election :  विशाल पाटील यांच्या उमेदवारी बाबत आज सांगली जिल्ह्यातील  काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटलांच्याअपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब आणि जिल्हा काँग्रेसची भूमिका स्पष्ट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे.

महाआघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील दोघेही आग्रही होते. परंतु सांगलीची जागा सेनेला गेल्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले  आहेत. काल मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव सुद्धा घेण्यात आला आहे.

Sangli Crime News : सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु

सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस हे नाव काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुसले आहे. त्यांनी आपला निषेध व्यक्त करत विशाल पाटील यांनी अपक्ष उभे राहावे अशी मागणी देखील केलेली. सांगलीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे.सांगलीमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटील  यांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सांगलीच्या जागेवर कॉंग्रेसने दावा केला  होता. परंतु शिवालय कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. तेव्हा महाआघाडीकडून सांगलीलोकसभा मतदारसंघासाठी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे कॉंग्रेस  कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झाली होती.

विशाल पाटील आता लोकसभा निवडणूकअपक्ष लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतल्याचं समोर आलं होतं. परंतु कोणतीही अधिकृत घोषणा त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. आज होणाऱ्या बैठकीनंतर हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागेललं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply