Maharashtra CM : एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, राजकीय हालचालींना वेग

 

Maharashtra CM News Update : विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम यश मिळालेय. महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय. मिळालेल्या माहतीनुसार एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपवल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची आज मुदत संपणार आहे. नवे सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं समजतेय. 2 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

राष्ट्रपती राजवट लागणार नाही

२६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असला तरीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही. राज्यात सत्ता स्थापन झालेली नसली तरीही नवी १५ वी विधानसभा अस्तित्वात. निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, निवडणूक आयोगाच्या २४ नोव्हेंबरच्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी रविवारी राज्यपालांना सादर केल्या आहेत.

Maharashtra Politics : निकालानंतर राजकारण ढवळून निघालं, बैठकांवर बैठका; CM पदासाठी रेस, मंत्रि‍पदासाठी लॉबिंग

 

मुख्यमंत्री कोण? मंत्रि‍पदासाठी लॉबिंग सुरु -

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात आता सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगात सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाबाबतच्या चर्चांसाठी युतीतील नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. अमित शाह आज मुंबईत येणार असल्याचं समोर आले आहे. अमित शाह मुख्यमंत्रि‍पदाचे कोडे सोडवण्यासाठीच मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला काय? याची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

 

एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री?

विधानसभेची मुदत आज संपत असल्यामुळे एकनाथ शिंदे आज नियमानुसार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कोणत्याही आघाडीकडे बहुमताचा स्पष्ट आकडा असेल तर त्यांना तो आकडा राज्यपालांची भेट घेऊन तो सादर करावा लागतो. राज्यपाल यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी काही अवधी मागण्याची विनंती करावी लागते.

पुढच्या ८ ते १० दिवसांत सरकार स्थापन करणार असल्याचं आश्वासित केल्यानंतर विधानसभेची मुदत संपल्यानंतरही सरकार स्थापन करता येतं. त्यामुळे या काळात नवं सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात.

एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लाडक्या बहिणींकडून महादेवाला साकडे

महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता कमालीची वाढली असून विविध चर्चाना उधाण आले. पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस या भोवतीच चर्चा फिरत आहे. शपथविधीचेही वेगवेगळे मुहूर्त सांगितले जात आहेत.विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठ्याप्रमाणावर यश मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी जळगावातील लाकडक्या बहिणींनी कुपालू शिव साई देवस्थानात महादेवाची महाआरती करून साकडे घातल्याचे पहायला मिळाले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply