Maharashtra Budget 2025 : मुंबईत तिसरं विमानतळ, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनला जोडणार; अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2025 : मुंबईमध्ये लवकरच तिसरं विमानतळ तयार होणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केली. वाढवण बंदाराजवळ मुंबईचे हे तिसरं विमानतळ तयार केले जाणार आहे. या बंदराजवळच मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्टेशन देखील असणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

राज्याचे अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी सांगितले की, 'जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित कर‍त आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26 टक्के आहे. वाढवण बंदरामुळे सुमारे 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे.'

Pune : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला पकडले- भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

तसंच, 'सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्‍या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल. वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे.', अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी दिली.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या तिसऱ्या विमानतळाबाबत घोषणा केली होती. याबाबत पीएम मोदींशी चर्चा केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. नागपूर, शिर्डी विमानतळासह पालघरमध्ये देखील विमानतळ तयार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मुंबईला तिसऱ्या विमानतळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते.

राज्यातील इतर शहरातील विमानतळाबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा. नेमकं काय म्हणाले...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 
नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. तेथून एप्रिल, 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन आहे.

नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ -
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत त्यामुळे वृध्दी होईल. विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल.

शिर्डी विमानतळ -
शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरु आहेत. सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

अमरावती विमानतळ -
अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च, 2025 पासून प्रवासी सेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत. गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु आहेत. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply