Maharashtra Budget 2024 : अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार; कोणकोणत्या मोठ्या घोषणा होणार?

Maharashtra Budget 2024 : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या काही महिन्यातच राज्यात लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमक्या कोणकोणत्या मोठ्या घोषणा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

राज्यातील पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश

त्याचबरोबर रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याचे संकेत आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (२६ फेब्रुवारी) अजित पवार यांनी एकूण ८ हजार ६०९.१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.

विधानसभा आणि विधान परिषदेत भाषण करताना अजित पवार यांनी या मागण्यांबाबत माहिती दिली. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होणार आहे. त्यानंतर त्याला मान्यता दिली जाणार आहे.

दुसरीकडे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारलाच चांगलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आज देखील विरोधक अर्थसंकल्पावरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply