Maharashtra Bhushan Award : अशोक सराफ हे मराठी मातीतला अस्सल हिरा: मुख्यमंत्री शिंदे

Maharashtra Bhushan Award : सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची भूक अजूनही अशोक सराफ यांच्यात कायम आहे. ते मराठी मातीतील अस्सल हिरे आहेत. अशोक सराफ यांचा मराठी मातीला, मराठी माणसाला सार्थ अभिमान असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

आज महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. गेल्यावर्षी आशा भोसले आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषणपुरस्कार दिले ते सुद्धा आम्हाला भाग्य मिळालं. खरं म्हणजे गेल्या ३ वर्षाचा बॅकलॉग सुधीर मुनगंटीवार यांनी भरुन काढला. राहिलेले पुरस्कार देण्यासाठी आम्हाला सरकार स्थापन करावे लागले. उरलेली काम करण्यासाठी हे सरकार स्थापन झाले असल्याचंही मुख्यमंत्री  यावेळी म्हणाले. 

Sharad Pawar Group New Symbol : शरद पवार गटाचं नवं चिन्ह 'तुतारी', निवडणूक आयोगाची घोषणा

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे

सर्व गौरवमूर्तींचे मनापासून अभिनंदन. अष्टपैलू, ऑल राऊंडर हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची भूक अजूनही त्यांच्यात आहे, ते मराठी मातीतील खरे हिरे आहेत.

अशोक सराफ वयाचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तरी साजरी करत असताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.

अशोक सराफ यांचे आडनाव जरी सराफ असले तरी त्यांची काही दागिण्यांची पेढी नव्हती मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर सोने, चांदी, हिरे, मोत्यांची अक्षरशः उधळण केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply