निसर्गसौंदर्याचा बडा नजराणा! हिरवा शालू नेसून सजलाय हा घाट, नक्की बघा

Maharashtra  : निसर्गसौंदर्याचा बडा नजराणा! उन्हाळ्यात काही घाट सदाबहार दिसतात आणि त्यांच्या याच वैशिष्ट्यांमुळे ते पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठकतात. यंदा १ मे महाराष्ट्रातील अशा काही ठिकाणांना तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी. आज आपण सह्याद्रीच्या कुशीतील अशाच एक घाटाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर.

माळशेज घाट. वर्षा ऋतूत तर कातळघाट हिरवा शालू नेसलेल्या नववधूसारखा अगदी खुलून दिसतो. माळशेज घाटामधून कल्याणगून ओतूरकडे जाताना डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. हा धबधबा तिन धारांमधून कोसळत असल्याने अतिशय मनमोहक दिसतो. याला थिबतिचा धबधबा असंही म्हणतात.

थिबती हे माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेले मुरबाड तालुक्यातील गाव. या गावात आदिवासी समाजाची मोठी वस्ती असून हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. उत्तुंग वाहत असलेल्या या धबधब्याचे सौंदर्य शब्दात वर्णन करता येणार नाही असे आहे.

या धबधब्याचं सौंदर्य बघण्यासाठी मात्र पायपीट करावी लागते. डोहात अनेक दगड गोटे असल्याने जरा जपूनच जलविहार करावा. पावसाळ्यात हा धबधबा उत्तुंग वाहतो आणि त्याने या परिसराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. बघता क्षणी त्या वेळी पर्यटक या नजाऱ्याच्या प्रेमात पडतात.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply