
Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. या सभांमधून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. अशातच रविवारी उद्धव ठाकरे यांनी पाटणमधील सभेत बोलताना शंभूराज देसाई यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान, या आरोपांना आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपावर भाष्य केलं. मी सर्व चौकशीला सामोरे जायला तयार आहे. राजकीय भाषणाला येताना कुणी कुणाच्या मुलाच्या लग्नात कुठून खर्च केला, इतक्या वैयक्तिक पातळीवरून जाऊन उद्धव ठाकरे टीका करतील अशी अपेक्षा नव्हती. उद्धव ठाकरे स्वत:ला सुसंस्कृत नेते समजतात, त्यांनी अशाप्रकारची टीका करणं दुर्दैवी आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.
|
Maharashtra : “ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा! |
उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली
उद्धव ठाकरेंकडे आता विकासाचे मुद्दे नाही. पाटणच्या विकासासाठी त्यांच्याकडे योजना आहे का? हे न सांगता त्यांनी माझ्या मुलाचं लग्न त्यांनी काढलं. मला लुटमार मंत्री म्हणाले. याचा अर्थ त्यांच्याकडे पक्षाचं धोरण तसेच मतदारसंघाच्या विकासाचं धोरण नाही. मुळात आम्हाला जे जनतेचं समर्थन मिळते आहे, ते बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अशाप्रकारची टीका केली जाते आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी रविवारी पाटणच्या सभेत बोलताना शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली होती. “पाटणमध्ये एक गद्दार आहे. तो राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. त्याने मंत्री असताना मुलाच्या लग्नासाठी सरकारी पैशांचा वापर कसा केला हे मला माहिती आहे. फक्त सत्ता येऊ द्या, त्यानंतर यांची सगळी प्रकरणं मार्गी लावतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच “याच गद्दाराने पाटणमध्ये उद्योग का आणले नाही? हे त्याला विचारा. या लोकांना मी सर्व दिले. तरीही यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला. गद्दारी करुन ते सुरतला गेले. तिकडून गुवाहाटीला गेले.” अशी टीकाही त्यांनी केली होती.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

