Maharashtra Politics: 'चिंगम' राऊतांनी 'सिंघम' फडणवीसांची चिंता करू नये, भाजप नेता भडकला

Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच धर्मवीर ३ चित्रपटाची स्क्रिप्ट लिहणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याच मुद्द्यावरून आज सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी या अग्रलेखामध्ये देवेंद्र फडणवीस यांना सिंघम असे म्हटले आहे. आता याच मुद्द्यावरून आता भाजपच्या नेत्याने संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये.', असे म्हणत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सामना अग्रलेखाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

प्रवीण दरेकर यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट लिहित सामना अग्रलेखावर प्रत्युत्तर दिले आणि संजय राऊत यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या 'चिंगम' संजय राऊत यांनी 'सिंघम' देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे. पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली आहे.'

Pune : कोंढव्यात १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त


'ज्यांनी आयुष्यभर 'चमचेगिरी' केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून 'चमचेगिरी' करणं यात फरक असतो. देवेंद्र फडणवीस जी हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी तुमचं 'चक्रव्यूह' भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्रजी फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलंच.', असे प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

तसंच, 'पण त्यापूर्वी पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर 'पत्राचाळीचा लुटारू राऊत' या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा. मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली. ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. देवेंद्रजी फडणवीस जी हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या 'नालायका'च्या सर्टिफिकेटची गरज नाही.', असे देखील दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply