Mahad MIDC News : महाड MIDC स्फोट, ७ जणांचे मृतदेह सापडले, ४ जण अद्यापही बेपत्ता

Mahad MIDC News : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत ७ कामगारांचे मृतदेह हाती लागले आहेत. मात्र, ४ जण अजूनही बेपत्ता आहेत. एनडीआरएफ टीम आणि हेल्थ फाऊंडेशनकडून बचावकार्य अद्याप सुरू आहे. स्फोटात कंपनीचे बांधकाम कोसळल्यामुळे आणि ज्वलनशिल रसायने असल्याने वेल्डींग, कटींग मशिनचा वापर करता येत नाही. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून30 लाख,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच विमा कंपन्यांकडून मदत मिळणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली.

Nashik Police : नाशिक पोलिसांचं पुन्हा मिशन सोलापूर; ड्रग्ज कारखान्यानंतर आता गोदामवर धाड, कोट्यवधींचा माल जप्त

महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी सकाळी सलग सात स्फोट झाले होते. सकाळी १० वाजता पहिला स्फोट झाला होता. त्यानंतर स्फोटांची मालिका सुरू झाली. सायंकाळपर्यंत जवळपास २०-२५ स्फोट झाले. यात ७ कामगार जखमी झाले होते. तर ११ जण बेपत्ता होते. त्यातील ७ जणांचे मृ्तदेह हाती लागले आहेत.

दरम्यान हा स्फोट इतका भयंकर होता की कंपनीमध्ये क्षणार्धात आग लागली. अग्निशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल ५ तासानंतर आग आटोक्यात आणली होती. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अद्यापही ४ कामगार बेपत्ता आहेत. एनडीआरएफच्या जवानांकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. हेल्थ फाऊंडेश, पोलीस प्रशासनाकडूनही बचावकार्यात मदक करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply