Madhya Pradesh Police : इलेक्शन ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या बसला अपघात; १० पोलीस कर्मचारी जखमी

Madhya Pradesh Police : छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात रविवारी मतदानाच्या ड्युटीला जाणाऱ्या बसला अपघात झालाय. जात असलेली बसचा उलटून अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशातील किमान १० पोलीस कर्मचारी जखमी झालेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे सर्व जखमी जवान सीआरपीएफचे असल्याचे एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर जगदलपूरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, झालेले पोलीस कर्मचारी जखमी मध्यप्रदेश पोलिसांचे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गीडाम-जगदलपूर मार्गावरील रायकोट गावाजवळ झाला. बस्तर येथे १९एप्रिल रोजी लोकसभेसाठी  मतदान झाले. येथील मतदानाच्या कर्तव्य बजावून सुरक्षा कर्मचारी महासमुंद लोकसभा मतदारसंघातील गरिबंद होणाऱ्या मतदानाच्या कर्तव्यासाठी जात होते. येथे २६ एप्रिल रोजीमतदान होणार आहे. मध्य प्रदेश पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस गुराढोरांना वाचवताना उलटली. बस चालकाला अचानकपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या गुराढोरं दिसली त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाली. या अपघाता १० पोलीस कर्मचारी जखमी झाले.

ओठांना फेविकॉल लावून तरुणीवर अत्याचार, आरोपीच्या घरावर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

स्थानिक पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेतून जगदलपूर येथील डिमरपाल येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यातील ५ जणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतरांना प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर सोडून देण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply