Lucknow Building Collapse : थरारक! लखनऊमध्ये पत्त्यांच्या बंगल्यासारखी इमारत कोसळली; दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू

Lucknow Building Collapse : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मंगळवारी सांयकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लखनऊच्या वजीर हसन रोडवर पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत इमारतीच्या मलब्याखाली आणखी व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.

घटनास्थळावरून तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. इमारतीत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहेत. इमारतीच्या मलब्याखाली अडकलेल्या व्यक्तींना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाची माहिती घेतली आहे. घटनास्थळाच्या माहितीनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाला पाठविण्याचे निर्देश दिले आहे. तसेच मुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले आहे. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, या इमारतीत १६ कुटुंब राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सपा नेते शाहिद मंजूर यांचं कुटुंब देखील या इमारतीत राहत होतं. इमारत कोसळली, त्यावेळी सपा नेते अब्बास हैदर यांचे वडील आणि काँग्रेस नेता अमीर हैदर आणि त्यांची पत्नी इमारतीत होती.

डीजीपी डीएस चौहान यांच्या माहितीनुसार, इमारत कोसळत असताना इमारतीत ८ कुटुंब होती. इमारतीतून ५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तर ३० ते ३५ लोक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे. रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply