Lonavala Skywalk Project : लोणावळ्यातील लायन्स, टायगर पॉइंटचे रुपडं पालटणार, उभारण्यात येणार ग्लास स्कायवाॅक प्रकल्प

Lonavala News : थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेतानाच थरार अनुभवायला मिळणार आहे. दोन हजार फूट दरीवरून चालण्याचा अन हवेतून झेपावण्याचा आनंद ही लवकरच घेता येणार आहे. राज्य सरकारने या पर्यटनस्थळी ग्लास स्काय वाॅक उभारण्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे.

त्यामुळं भविष्यात लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर पॉइंटच रुपडं अक्षरशः पालटून जाणार आहे. दोन हजार फूट खोल दरीवर स्काय वॉक उभारून हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडले जाणार आहेत.

Ulhasnagar News : उल्हासनगर येथील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; २ कामगारांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

यानिमित्ताने दरीवरून चालण्याचा अन झिप लाईनद्वारे हवेतून झेपावण्याचा थरार पर्यटकांना अनुभवता येणार आहे. सोबतच लहानग्यांसाठी विविध खेळ, अँपी थिएटर, फूड पार्क, खुले जिम अन प्रशस्त पार्किंगची सोय केली जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply