Lonavala Crime News : वेताळबाबा टेकडीवर पाेलिसांचा छापा, जुगार खेळणा-या नऊ जणांना अटक, लाखाचा मुद्देमाल जप्त

Lonavala Crime News  : देवघर येथे बेकायदेशिररित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणावळा पाेलिसांनी छापा टाकत नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील युवा पिढीवर वाईट परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने हाेत हाेत्या. पाेलिस प्रमुख सत्यसाई कार्तीक यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या हाेत्या.

PM Modi : पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर; देशातील पहिल्या ‘अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पा’चे करतील उद्घाटन .

कार्तिक यांनी तपासाची सूत्र फिरवत एक पथक तयार केले. या पथकाने देवघर मधील वेताळबाबा टेकडीवर सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये काही लाेक पैशांवर पत्ते खेळत हाेते. या सर्वांना पाेलिसांनी ताब्यात घेत त्यांना अटक केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *