Loksabha Election : मुंबईत भाजपकडून तिकीट वाटपात धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता, बड्या नेत्यांचं तिकीट कापलं जाणार?

 

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांना डावलत त्याचा पत्ता कट केला जाऊ शकतो. मतदारसंघातील कल पाहून निर्णय घेत जिंकू शकणाऱ्या नेत्यांना भाजपकडून लोकसभेसाठी पुढे केले जाऊ शकते.

भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील पूनम महाजन आणि ईशान्य मुंबई मतदारसंघातील मनोज कोटक यांच्याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे.

Pune News : ओला, उबरचा वाहतूक परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला

पूनम महाजन यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने आशिष शेलार यांना या जागेसाठी भाजपकडून विचारणा करण्यात आल्याचं बोललं जात आहे.मात्र आपण लढण्यास इच्छुक नसून, पूनम महाजन यांना निवडून आणू असा विश्वास आशिष शेलार यांनी केंद्रीय नेतृत्वाला दिल्याची माहिती साम टीव्हीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

तर मनोज कोटक यांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा पराग शहा यांचा नावाचा विचार सुरू आहे. मनोज कोटक यांना पुन्हा तिकीट द्यायचं की त्यांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा पराग शहा यांच्या पैकी एकाला संधी द्यायची यावर देखील भाजप नेतृत्वाचा विचार सुरू आहे. येत्या 48 तासांत मुंबईतल्या या दोन जागाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply