Loksabha Election : मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? म्हणाले, 'मी उमेदवार असेन की नाही हे..'

Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच दावा आहे आणि तो कायम असणार आहे. मी उमेदवार असेन की नाही हे वरिष्ठ ठरवतील; पण कमळ निशाणीवरचा उमेदवार असेल हे नक्की आहे. मी लोकसभेसाठी इच्छुक नाही. माझ्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ घेतील. निवडणुकीच्या  अगोदर बोलणे उचित नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि उद्यममंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने राणे रत्नागिरीत आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रिफायनरीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘रिफायनरी मी आणणार. माझे संबंधित मंत्र्यांशी बोलणे सुरू आहे. संबंधित कंपनीशी मंत्र्यांचा संवाद सुरू आहे. रिफायनरीमुळेमोठा रोजगार तयार व्हावा, छोटे-मोठे उद्योजक यावेत आणि ते स्थानिक असावे, असा आमचा प्रयत्न आहे. रिफायनरीमुळे रत्नागिरीचा मोठा विकास होणार आहे.’

Jalgaon Crime News : दारूच्या नशेत ६५ वर्षीय वृद्धाकडून चिमुकलीवर अत्याचार

ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणासंदर्भात आख्ख्या महाराष्ट्राची भूमिका ट्विट केली आहे. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपमध्ये कोण येईल, त्याचे स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. लघु, सूक्ष्म खात्याचे कार्यालय रत्नागिरीत उभे करणार असून, त्यासाठी जागा पाहायला सांगितली आहे.’

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply