Maharashtra Lok sabha election result I 2024 : ED-CBI च्या भीतीने पक्ष बदलणाऱ्यांना झटका; १३ पैकी ९ जण पराभूत

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अनेक नेत्यांनी पक्षबदल केला होता. त्यामधल्याबहूतांश जणांना पराभवाच तोंड बघावं लागलं आहे. पराभूत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातून शिवसेनेच्या यामिनी जाधव, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे तापस रॉव, झारखंमध्ये काँग्रेसचे प्रदीप यादव, राजस्थानमधील ज्योती मिर्धा या नावांचा समावेश आहे.पक्षबदल केलेल्या या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांना सामोरं जावं लागलं होतं किंवा त्यांच्या कुटुंबियांना तपास यंत्रणांचा जाच सुरु झाला होता. पराभूत झालेल्या नऊ जणांपैकी सात जण भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे नेते होते.

देशभरामध्ये १३ नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा सामना करत आहेत. यामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा समावेश आहे. १३ पैकी आठ जण भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यापैकी सात जण काँग्रेसमधून गेले आहेत तर एक तृणमूल काँग्रेसधून झारखंड विकास पार्टीमध्ये गेले आहेत.पराभूत झालेल्या पक्षबदलू उमेदवारांमध्ये राजस्थानच्या नागौरमधून ज्योती मिर्धा, उत्तर प्रदेशातल्या जैनपूर येथून कृपाशंकर सिंह, कोलकाता उत्तर प्रदेशातून तपस रॉय, आंध्र प्रदेशातल्या अराकूमधून कोथापल्ली गीता, पियालामधून प्रणीत कौर आणि झारखंडमधून सिंहभूममधून गीता कोडा यांचा समावेश आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आजच करणार सरकार स्थापनेचा दावा, TDP आणि JDU ने दिलं समर्थन पत्र

पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते ज्योती निर्धा लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये भाजपमध्ये सहभागी झाले होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशकर सिंह हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.
शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेच्या गटामध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंच सरकार गेलं. यामिनी आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये ईडीची चौकशी सुरु होती. त्यांना एनडीएने मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल होत. परंतु त्याना उद्धव ठाकरें गटाचे अरविंद सावंत यांनी पराभूत केलं.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply