Loksabha Election 2024 : भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार? दिग्गजांची धाकधुक वाढली

Loksabha Election 2024 : एकीकडे महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षामधील अनेक विद्यमान खासदारांचा लोकसभेतून पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

भाजपच्या नेतृत्वाकडून भाजपच्या राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. या सर्वेमध्ये अनेक खासदारांची पाच वर्षांची कामगिरी समाधान कारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अशा खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune News : पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणात मिस्ट्री गर्ल आली समोर; मास्टरमाईंडच्या प्रेयसीच्या अटकेनंतर मोठी अपडेट

दिग्गजांचा पत्ता कट होणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभेची उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली याबाबतचा निकष भाजप पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यासमोर ठेवण्यात आला. अशातच भाजप नेतृत्वाने केलेल्या सर्वेमधून काही खासदारांची कामगिरी समाधान कारक नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळेच अशा खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन दिवसात भाजपकडून लोकसभा उमेदवारांची यादी येऊ शकते. यामध्ये अनेक नवे चेहरे असण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेच्या बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, अहमदनगर, वर्धा, रावेर, या जागांवरील भाजप उमेदवार बदलले जाण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभेत ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपने प्रत्येक जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळेच निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची पक्षाला आवश्यकता आहे. तसेच स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे दिग्गजांचा पत्ता कट होणार असल्याचे बोलले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply