Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी सांगितला भाजपचा मास्टर प्लॅन

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. तसेच आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी नाही तर देशासाठी महत्वाची आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस  म्हणाले, "सगळ्या मतदारसंघात आणि सगळ्या बुथवर भाजप मजबूत करायची आहे. जिथे मित्रपक्ष लढतील तिथं त्यांच्या पाठिमागे आपल्याला उभं राहायचं आहे. ही निवडणूक भाजपसाठी नाही तर भारतासाठी महत्वाची आहे. कारण ज्या प्रकारे मोदीजींनी भारताला पुढे नेलं आहे. त्यामुळे २०२४ ते २०२९ हा काळ भारतासाठी निर्णायक असणार आहे. यासाठी सर्वांनी ध्येय समोर ठेऊन काम करावं."

Ajit Pawar : 'महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर...' अजित पवार गटाचे आमदार भुजबळांच्या पाठीशी पण वरिष्ठांकडून देण्यात आल्या खास सूचना



भारत विश्वचषक हारला कारण तेथे नरेंद्र मोदी आले होते. त्यामुळे पनवती लागली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

"नरेंद्र मोदी यांच्यामुळे भ्रष्टाचारी लोक भयभीत आहेत. त्यामुळे त्यांना मोदींबाबत तसं वाटत असेल. मात्र सामान्य लोकांसाठी नरेंद्र मोदी मसीहा आहेत. मोदीजी देशाचे रक्षक आहेत. राहुल गांधी यांना त्यांचा पक्ष देखील गांभीर्याने घेत नाही. लोक देखील त्यांना गांभीर्याने घेत नाही," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply