Loksabha : दावा सोडा अन्यथा 'कमळा'वर लढा! दक्षिण मुंबईच्या जागेवरुन शिंदे गट- भाजपमध्ये रस्सीखेच; उमेदवारी कोणाला?

Loksabha : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटत नसल्याची चिन्हे दिसत आहे. लोकसभेच्या अनेक जागांवरुन शिवसेना शिंदे गट तसेच भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता दक्षिण मुंबईच्या जागेवरुन पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. दक्षिण मुंबईची जागा सोडण्याचा आग्रह भारतीय जनता पक्ष करत आहे. मात्र शिवसेनेचा जागा सोडण्यास नकार आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

दक्षिण मुंबईच्या जागेवरुन रस्सीखेच...

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. मात्र अरविंद सावंत यांविरोधात असलेला रोष हा भाजपसाठी मदतीचा ठरणार आहे. तसेच मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबईची जागा सहज जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी भाजप आग्रही आहे. परंतु, शिवसेनेचा मात्र ही जागा सोडण्यास नकार आहे.

Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणावर हायकोर्टाचे राज्य सरकारला महत्वाचे निर्देश

उमेदवारी कोणाला?

दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा व यशवंत जाधव लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. तर भाजपचे राहुल नार्वेकर व मंगल प्रभात लोढा यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवार कुणीही असो, मात्र कमळावर लढवा, असेही भाजपचे म्हणणे आहे. कमळ चिन्हावर लोकसभा जिंकण्याची शक्यता अधिक असल्याने ही जागा भाजपकडून लढवण्याचा प्रस्ताव शिंदे गटाकडे दिला आहे. यावर आता शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दक्षिण मुंबईसाठी भाजपचा हट्ट का?

विधानसभेत युती नसताना झालेल्या स्वतंत्र लढतीत भाजपने शिवसेनेहून अधिक मते घेतली होती. दक्षिण मुंबईत सध्या शिंदेच्या शिवसेनेसोबत केवळ एक आमदार असून दोन आमदार ठाकरे गटाकडे आहेत. याउलट भाजपचे दोन आमदार कार्यरत आहेत. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा जबरदस्त मोदी लाट दिसेल.

त्यामुळे भाजपसाठी दक्षिण मुंबईत पोषक वातावरण असेल. विशेषतः महिला व तरूणांवर असलेले नरेंद्र मोदींचे गारुड पाहता धनुष्यबाणाहून अधिक मते कमळाला मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेनेला उमेदवार द्यायचा असेल तर तो कमळ चिन्हावर द्यावा, अशी चाचपणी महायुतीत सुरु आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply