Lok Sabha Security Breach : संसदेची सुरक्षा ठेवता येईना, देशाची सुरक्षा कशी करणार; शरद पवार गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Lok Sabha Security Breach :  हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच संसदेत प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन एकाने सोबत आणलेला कलर स्प्रे करून धूर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन थेट सभागृहातच आंदोलन केल्याने संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान, या घटनेवरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. “संसदेची सुरक्षा ठेवता येईना, देशाची सुरक्षा कशी करणार" असा खोचक टोलाही राष्ट्रवादीच्या ट्वीट अकाऊंटवरून लगावण्यात  आला आहे. 

यावेळी करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की," देशाच्या संसदेतील लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आज घडलेल्या घटनेतून गांभीर्याने लक्षात आले. प्रेक्षक गॅलरीतून 2 अज्ञात तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करून, एकच गोंधळ उडवला. ज्यामुळे लोकसभा सदस्यांना त्याचा त्रास भोगावा लागला. 

Vitthal Rukmini Mandir Prasad : विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा; हिवाळी अधिवेशनात लेखापरीक्षण अहवाल सादर

देशाच्या नवीन संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत अशा त्रुटी असणे म्हणजे केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्र्यांची देशाच्या सुरक्षिततेबाबत असणारी गांभीर्यता यातून लक्षात येते. पुन्हा सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसते, सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा कशी ठेवता येईल हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी हीच अपेक्षा, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply