
Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला फटका बसला आहे. भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याची मी जबाबदारी घेतो. मला जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती मी केंद्रातील नेत्यांना करणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. असे असतानाच भाजपचे मोहित कंबोज यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. एकीकडे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली असताना कंबोज यांच्या ट्वीटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?
मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं आहे. फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं आहे. राज्यातले मंत्री आणि ज्येष्ठ नेतेही पराभवासाठी जबाबदार आहेत. महाराष्ट्र भाजप आणि मुंबई भाजपनं आत्मपरिक्षण करायला हवं, असं मोहित कंबोज आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
|
|
कंबोज यांचा रोख कुणाकडे?
कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या आणखी काही नेत्यांना लोकसभा निवडणुकीतील कामगिरीला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, असे विचारले जात आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
या लोकसभा निडणुकीत महायुतीच्या जागा घटल्या. भाजपच्याही जागा कमी झाल्या आहेत. या खराब कामगिरीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. भाजपच्या या खराब कामगिरीची मी जबाबदारी स्वीकारतो. मला मंत्रिमंडळातून मुक्त करावं, अशी विनंती मी केंद्रातील शीर्षस्थ नेत्यांना करणार आहे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करण्यासाठी हा निर्णय घेण्याची मी तयारी केली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

