Lok Sabha exit poll results : पश्चिम बंगालमध्ये ममतांना धक्का बसणार; एक्झिट पोलनुसार २०१९ पेक्षाही कमी जागा मिळण्याची शक्यता

Lok Sabha exit poll results :  या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक प्रचार करताना दिसला होता. त्याचा फायदा भाजपला होताना दिसतं आहे. मॅट्रीज आणि जन की बात एक्झिट पोलने मांडलेल्या अंदाजानुसार भाजपला २१-२५ आणि २१-२६ मिळतील तर टीएमसी 16-20 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज एक्झिट पोलने मांडला आहे. ४ जून रोजी एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसला २०१९ पेक्षाही कमी जागा मिळतील.

मॅट्रिज एक्झिट पोलनुसार, टीएमसी 16-20 जागा मिळतील, जन की बातच्या एक्झिट पोलनुसार 18-16 जागांचं अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे. PMARQ च्या एक्झिट पोलने भाजपला 22 आणि TMC ला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. डी-डायनॅमिक्सने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला २१ जागा आणि टीएमसीला १९ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Pandharpur : विठुरायाच्या दर्शनाने मन सुखावले; पदस्पर्श दर्शनाला सुरवात, भाविकांची गर्दी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या तर तृणमूलने 22 जागांवर विजय मिळवला होता. तृणमूलला ४३.२८ टक्के मतं तर भाजपला ४०.२५ टक्के मतदान झालं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केळ 17 टक्के मतं मिळाली होती. त्यावेळी फक्त 2 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, तृणमूलने २०१४ मध्ये जिंकलेल्या 34 जागांपैकी 12 जागा गमावल्या होत्या.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये जोरदार प्रचार पहायला मिळाला. जर 4 जून रोजी एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले, तर ते राज्यात भाजपला आणखी प्रवेश मिळणार आहे. लोकसभेसाठी 42 जागांवर 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये सर्व सात टप्प्यांत विक्रमी मतदान झालं. देशातील हे उच्चांकी मतदान ठरलं आहे. पहिल्या टप्प्यात 82 टक्के, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 72 टक्के तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात अनुक्रमे 77.53, 80.22, 78.45 आणि 82.71 मतदान झालं. पश्चिम बंगालमध्ये देशातील लोकसभेच्या तिसऱ्या क्रमांकाच्या ४२ जागा आहेत. यापैकी 30 जागा अनारक्षित, तर 10 जागा अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी आणि दोन अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply