Lok Sabha Election : धाराशिवमध्ये भाजपला मोठा धक्का; निवडणुकीआधीच ठाकरे गटाचा बडा नेता स्वगृही परतणार

Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशात अनेक नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. सध्या असलेल्या पक्षावर नाराजी असल्यास अनेक जण पक्ष बदलताना दिसत आहेत. अशात आता धाराशिमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीआधीच भाजपमध्ये गेलेले ठाकरे गटाचे बडे नेते पुन्हा स्वगृही परतत आहेत.

धाराशिवचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव बापू कांबळे यांचा शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीये. कैलास पाटील यांच्या नेतृत्वात शिवाजीराव कांबळे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.

Sassoon Hospital : ससून रुग्णालयातील गोंधळ अद्याप सुरूच; वैद्यकीय अधीक्षक बदला, डीन डॉ. काळे यांची मागणी

भोकर येथे उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी शिवाजीराव बापू कांबळे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. शिवाजीराव बापू कांबळे हे यापूर्वी शिवसेनेकडून २ टर्म खासदार राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 10 वर्षे राज्य कार्यकारिणीवर त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर आता ते पुन्हा स्वगृही परतत आहेत.

माढ्यात भाजपला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर भाजपला माढामधून देखील मोठा धक्का बसला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छूक होते. मात्र भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी राजीनामा दिला आणि शरद पवार गटाची साथ दिली. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेच्या रिंगणात आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply