Lok Sabha Election 2024 : देशात ७ टप्प्यांत लोकसभा निवडणुका; १९ एप्रिलला मतदान, ४ जूनला मतमोजणी

Lok Sabha Election 2024 : भारतीय निवडणूक आयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. दोन्ही नवीन निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारताच निवडणूक आयोगाने चार राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. देशातील ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच देशात आदर्श आचारसंहिताही लागू झालीय. 

तारखा जाहीर करण्याआधी मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी आयोगाने केलेल्या कामांची माहिती दिली. पत्रकार परिषद सुरू करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नव्याने नियुक्त झालेल्या दोन्ही निवडणूक आयुक्तांची ओळख करून दिली. 2024 हे जगभरात निवडणुकांचं वर्ष आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील. आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील निवडणुका होणार आहेत.

CM Eknath Shinde : 'ते' सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत फिरताहेत; राहुल गांधींचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी २१ राज्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्याचे २० मे रोजी, सहाव्या टप्प्याचे २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. तिसऱ्या टप्प्यात ९४ जागांवर, चौथ्या टप्प्यात ९६ जागांवर, पाचव्या टप्प्यात ४९ जागांवर, सहाव्या टप्प्यात ५७ जागांवर आणि सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे.

९७ कोटी मतदारांनी नोंद केली आहे. ५४ लाख पेक्षा जास्त EVM मशिन्स आहेत. मागच्या वर्षात ११ राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या. कोर्टाने आमच्यावर केलेल्या केसेस देखील कमी झाल्या. टेक्नॉलॉजी, मनुष्यबळ यात आम्ही परिपूर्ण आहोत. १८ ते १९ या वयातील १.८ 8 कोटी तरुण मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. ८२ लाख मतदार  हे ८५ पेक्षा जास्त वयाचे आहेत. ४८ हजार तृतीयपंथीय मतदान करणार आहेत. आम्ही महिला मतदारांवर जास्त भर दिला आहे. महिलांचा मतदानाचा वाटा वाढला आहे. महिला मतदारांची संख्या १२ राज्यात पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply