Lok Sabha Election 2024 : मुंबईत पाचव्या टप्प्यात होणार मतदार, २४ लाख ४६ हजार मतदार करतील मतदान

Lok Sabha Election 2024 : भारत निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणूक – २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात ३०-मुंबई दक्षिण मध्य,व ३१- मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ असून २४ लाख ४६ हजार ०८८ पात्र मतदार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात दिनांक २० मे २०२४ (सोमवार) रोजी पाचव्या टप्य्यात मतदान होणार असून दिनांक ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

मुंबई शहर जिल्हा कार्यालय, नियोजन भवन, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी माहिती दिली. 

Indapur Firing : महाराष्ट्रात पुन्हा गोळीबार; हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या युवकाची निर्घृण हत्या

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २६ एप्रिल २०२४ (शुक्रवार)  

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक ३ मे २०२४ (शुक्रवार)

नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक ०४ मे २०२४ (शनिवार)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ०६ मे २०२४ (सोमवार)

मतदानाचा दिनांक २० मे २०२४ (सोमवार)

मतमोजणी दिनांक ०४ जून २०२४ (मंगळवार)

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक ६ जून २०२४ (गुरुवार)

आदर्श आचारसंहितेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे

सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीची आदर्श संहिता सुरु आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्वसंबंधीत घटकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आणि मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांसाठी असलेल्या सोयी सुविधा, मतदान केंद्राची रचना तेथील सुविधा, संवेदनशिल मतदान केंद्रासंदर्भात विशेष उपायोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply