Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; हरियाणातील या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे हरियाणातील लोकसभा खासदार बृजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान बृजेंद्र सिंह यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

शराजकीय कारणामुळे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांचे आभार मानतो, असं बृजेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ब्रिजेंद्र सिंह हे माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांचे पुत्र असून त्यांच्या कुटुंबाचा काँग्रेसशीदीर्घकाळ संबंध आहे. कुलदीप बिश्नोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बृजेंद्र सिंह यांचे तिकीट कापण्याची शक्यता होती. याशिवाय जेजेपी युतीमुळे चौधरी बिरेंद्र सिंह यांचे कुटुंबीयही भाजपवर नाराज होते. शेतकरी आंदोलन, अग्नीवीर आणि महिला कुस्तीपटूंच्या मुद्द्यावरून बृजेंद्र सिंह यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Akola Crime News : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अकोल्यातील मन हेलावणारी घटना

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दुष्यंत चौटाला आणि भव्य बिश्नोई यांचा पराभव करून हिसारमधून विजय मिळवला होता. प्रसिद्ध शेतकरी नेते छोटू राम यांचे ते पणतू आहेत. त्यांचे वडील बिरेंद्र यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आणि आई प्रेमलता सिंह यांनी उचाना विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

ब्रिजेंद्र सिंग हे लोकलेखा समिती आणि संरक्षणविषयक स्थायी समितीचे सदस्यही आहेत. ते माजी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत, त्यांनी 21 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. 1998 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत 9 वा क्रमांक मिळविला. ब्रिजेंद्र सिंह यांनी जेएनयूमधून मॉडर्न हिस्ट्रीमध्ये एमए केले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बृजेंद्र सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला होता. गेल्या वर्षी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना ब्रिजेंद्र सिंह यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता. बृजेंद्र सिंह 2022 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्यांनी या चर्चाचं खंडण केलं होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply