Lok Sabha Election 2024 : महायुतीचं ठरलं! पुढील ४८ तासांत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केलीय. आता राज्यातील जागा वाटपाचा निर्णय होणार आहे. येत्या ४८ तासात हा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. राज्यातील जागा वाटपाविषयी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत जागा वाटपावर सकारात्मक निर्णय झालाय. 

अमित शाह यांच्या बैठकीतील तोडगा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे. भाजप विद्यमान खासदारांच्या जागा भाजप मित्र पक्षांना सोडणार आहे. सर्वेक्षणानंतर शिवसेनेला १५ ते १६, तर राष्ट्रवादीला ५ ते ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण शिवसेना लोकसभेच्या २२ तर अजित पवार यांना १० ते १२ जागा हव्यात अशी माहिती समोर आलीय. तर भाजप ३२ जागा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

Dombivli News : डोंबिवलीतील बटर कारखान्यावर क्राइम ब्रांचचा छापा; झाडझडती घेताच अधिकारीही चक्रावले

 

आज अमित शाह  यांच्या बैठकीत यावर परत एकदा चर्चा झाली असून भाजप  २६ ते २८ जागांवर निवडणूक लढवेल असं म्हटलं जात आहे. पुढील ४८ तासांत महायुतीच्या लोकसभा  जागांच्या फॉर्म्युलावर अंतिम निर्णय सार्वजनिक होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जागा वाटपाबाबत आपली प्रतिक्रिया दिलीय. तुमच्या फॉर्मुक्यवर मी काय बोलणार. शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला पाहिजे. आम्हाला विश्वास असून आम्हाला दिलेला शब्द पाळला जाईल. निवडून येणं हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. राज्यात ४५+ जागा निवडून आणत पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार करायचे असल्याचं भुजबळ म्हणाले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply