Lok Sabha Election 2024 : सरकार स्थापनाच्या घडामोडींना वेग; केंद्रात २ 'बाबूं'ची एन्ट्री, भाजपला ५ मंत्रिपदे गमवावी लागणार?

New Delhi : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झालं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागा जिंकल्या. लोकसभेच्या निकालानंतर भाजपने केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तर केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बुधवारी दिल्लीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रात नव्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस दिल्लीत PM मोदी आणि अमित शहांना भेटणार, राजीनाम्याच्या इच्छेवर काय निर्णय घेणार?

नव्या सरकारमध्ये भाजपला पाच मंत्रिपदे गमावावी लागणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल पाच मंत्रिपदे दिली जाणार आहेत. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपदे असा भाजपचा फॉर्म्युला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नितीश कुमार यांच्या १२ जागांसाठी २ कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांच्या १६ जागांसाठी ३ कॅबिनेट मंत्रिपदे दिली जाणार आहेत. दोन्ही पक्ष मोठ्या खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, नव्या सरकारमध्ये भाजप मोठी खाती स्वत:कडे ठेवण्याची शक्यता आहे. यात गृह, रेल्वे, अर्थ मंत्रालया, परराष्ट्र, सरंक्षण, आयटी खाते भाजप स्वत: ठेवण्याची शक्यता आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये कोणाला कोणती मंत्रिपदे मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

शपथविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपधविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण द्यायला देखील सुरुवात झाली आहे. तर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काल मोदींनी फोन करत पुष्प कमल यांना निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply