Lok Sabha Election 2024 : समोर पराभव दिसत असल्याने असे खोटे आरोप; रोहित पवारांच्या दाव्याला मंत्री शंभुराज देसाईंचे, म्हणले

Lok Sabha Election 2024 : बारामतीत विरोधकांकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्षरोहित पवार  यांनी केला आहे. बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्षांनी केला आहे. रोहित पवारांनी  एक्सवर व्हिडिओ शेअर करत पैसे वाटप झाल्याचा आरोप केला होता.

यावर आता राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देत रोहित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पराभव समोर दिसायला लागला की अशा पद्धतीने आरोप केले जातात. ही नेहमीची काही लोकांची सवय आहे. कुठले तरी व्हिडिओ टाकून तिथे पैशांचा वापर होत असल्याचा दावा करायचा, ज्यांना पराभवसमोर दिसतो त्याच वेळी हे असे प्रकार होतात. मी बारामती लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतली. तिथं परिस्थिती एकदम सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई  यांनी बोलताना दिलीय. 

Sunil Shelke Vs Rohit Pawar : सुनिल शेळकेंचे रोहित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले मटण अन् मतांना दोन हजार...

समोर पराभव दिसत असल्याने असे खोटे आरोप

भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले  होते.  ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात होता,  त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या. त्यावरुन आता राज्याचे राजकारण तापल्याचे बघायला मिळत आहे. अशातच राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी हे सर्व आरोप खोट असल्याचे म्हटलंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply