Lok Sabha Election : जालन्यातून जरांगे पाटलांनीच निवडणूक लढावी; मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक पक्ष उमेदवारांचे नाव जाहीर करत आहे. या दरम्यान जालना लोकसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनीच उमेदवारी दाखल करावी. अपक्ष उमेदवार नकॊच; असा ठराव मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये एकमताने संमत करण्यात आला.

जालना लोकसभा निवडणुकीत  मराठा समाजाचा उमेदवार निवडावा किंवा अपक्ष उमेदवार उभा करावा; या बाबत आज जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, जालना आणि बदनापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठका घेण्यात आल्या. या समाजाच्या बैठकीत मराठा समाजाने स्वातंत्र्य उमेदवार दिला, तर त्याचा परिणाम काय होईल.? यावर चर्चा करण्यात आली.

Dharashiv Crime News : तुळजापूर तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाची धाड, 5 लाखांची दारु जप्त

समाजाच्या अपक्ष उमेदवारामुळे आरक्षण आंदोलनाला विरोध करणाऱ्या पक्षाला याचा मोठा फायदा होईल, अशी शंका या बैठकीत उपस्तित करण्यात आली. यावरून जरांगे पाटील यांनीच उमेदवारी करावी असा बैठकीत एकमताने परित करण्यात आलेला ठराव तात्काळ जरांगे पाटील यांना पाठवण्यात आला. यावर मनोज जरांगे पाटील उद्या काय निर्णय घेतात हे पाहणं अत्ता महत्वाचं ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply